Breaking news

मावळ भूमीचा अभिमान! प्रबोधनकार सागर वाघमारे यांना 'राज्यस्तरीय उत्कृष्ट शिव व्याख्याते' पुरस्कार जाहीर

वडगाव मावळ : मावळ तालुक्याचा अभिमान आणि समाज प्रबोधनाची प्रेरणा ठरलेले प्रबोधनकार सागर भाऊ वाघमारे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिव व्याख्याते पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार श्री. अनंतपाळ ग्रामीण मराठी कवी संमेलन, शिरूर जिल्हा लातूर यांच्या वतीने गोविंद श्रीमंगल यांच्या जन्म सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिला जाणार आहे. राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा दि. 6 जुलै 2025 रोजी संत सेना महाराज मंदिर, लातूर येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री पूजा माळी असतील तर संस्थापक अध्यक्ष कवी गोविंद संभाजी श्रीमंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

     सागर वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, जिजामाता या थोर व्यक्तींच्या विचारसरणीचा प्रभाव घेत समाज परिवर्तनाच्या दिशेने आपल्या कार्याचा प्रवास सुरू केला. लेखकांना व्यासपीठ देणे, भव्य स्पर्धांचे आयोजन, प्रबोधनात्मक व्याख्याने आणि सामाजिक प्रश्नांवर अचूक मांडणी हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यांनी आपल्या अभ्यासातून आणि विचारांतून समाजाच्या मुळाशी जाऊन बदल घडवण्याचे काम सातत्याने केले आहे.

इतर बातम्या