Breaking news

पवना धरण परिसरात बुधवारी जोरदार पाऊस ! 24 तासात 94 मिमी पावसाची नोंद; धरणात 66.49 टक्के पाणीसाठा

लोणावळा : संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराची व मावळ तालुक्याच्या काही भागात तहान भागविणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरण परिसरात बुधवारी 2 जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. 24 तासात धरण क्षेत्रात 94 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आज पर्यंत पवना धरण क्षेत्रामध्ये 1022 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज अखेर केवळ 315 मिमी पाऊस झाला होता व धरणात सुद्धा 18.38 टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता.

    यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केली आहे. संपूर्ण जून महिना मावळात पाऊस पडत राहिल्याने तालुक्यातील सर्वच धरणे जवळपास भरली आहेत. वडिवळे व कासारसाई या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मावळातील सर्व धरणे शंभर टक्के भरतील अशी स्थिती आहे.

इतर बातम्या