Lonavala Rain Information l लोणावळ्यात गुरुवारी 115 मिमी (4.53 इंच) पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहर परिसरात पावसाचा जोर कायम असून गुरुवारी 26 जून रोजी शहरात 24 तासात 115 मिमी (4.53 इंच) पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या सोबत हवा देखील मोठ्या प्रमाणात आहे.
लोणावळा शहरात यावर्षी आज अखेर पर्यंत 1773 मिमी (69.80 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत जेमतेम 480 मिमी (18.90 इंच) पाऊस झाला होता. हवामान विभागाने यावर्षी जोरदार पावसाचे संकेत दिले आहेत. तसेच पाऊस देखील यंदा लवकर सुरू झाल्याने जून महिन्यात पाऊस शंभराच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.