Breaking news

लोणावळ्यात भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीपणे पार पडले

लोणावळा : भगवान महावीर स्वामींच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त आणि आचार्य आनंद महर्षीजी मासा यांच्या पुण्यस्मरणार्थ, आनंद महिला मंडळ लोणावळा यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर जैन स्थानक, लोणावळा येथे पार पडले.

      शिबिरात लोणावळा आणि परिसरातील तब्बल 250 नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये 150 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, तर 25 रुग्णांमध्ये मोतीबिंदूची लक्षणे आढळून आली असून, त्यांच्यावर येत्या 21 एप्रिल रोजी पुण्याच्या ससून रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

      या उपक्रमासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांची विशेष टीम लोणावळ्यात आली होती. या सेवाभावी उपक्रमात लायन्स क्लबचे डिस्टिक रीजन चेअरमन आणि माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक लायन विठ्ठलराव वरुटे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

       शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता भुरट, प्रकल्प प्रमुख साधना टाटिया, तसेच सविता भुरट, निर्मला लुनावत, छाया सोनिगरा, सुमिता लुनावत, आशा चोरडिया, ज्योती पारख, वंदना ओस्तवाल, वंदना लुनावत आणि गिरीश पारख यांचे मोलाचे योगदान होते. जैन स्थानकाचे सचिव संतोष चोरडिया, खजिनदार विनोद लुंकड, सहसचिव जितेंद्र ललवाणी, उपाध्यक्ष किशोर पारख, युवक मंडळ अध्यक्ष अक्षय कांकरिया यांनी देखील शिबिरासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्व. देवेंद्र टाटिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, साधना टाटिया यांनी शिबिरासाठी मोफत चष्मे उपलब्ध करून दिले.

इतर बातम्या