Breaking news

आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य; त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – देविदास कडू

लोणावळा : लोणावळा शहर भारतीय जनता पार्टी व देविदास कडू युवा मंच यांच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. लोणावळा शहर व परिसरामधील विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यामध्ये सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना लोणावळा भाजपाचे गटनेते व माजी नगरसेवक देविदास कडू म्हणाले आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही कायम तत्पर राहू. विद्यार्थ्यांना मिळालेले हे यश हे त्यांच्यासोबत त्यांचे आई-वडील गुरुजन व नातेवाईक या सर्वांचे यश आहे त्यामुळे हे सर्वजण कौतुकास पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्यकाळामध्ये उत्तम अशा करिअरच्या संधी शोधत त्यामधून स्वतःचे व समाजाचे नेतृत्व करावे, स्पर्धा परीक्षांची कास धरावी असे सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या लोणावळा शहरातील व मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या रोख रकमेच्या योजना देखील जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेमध्ये येत आपल्या शहराचे व तालुक्याचे नेतृत्व करावे असा संदेश त्यांनी या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व पालकांना दिला आहे. 

      लोणावळा शहर भारतीय जनता पार्टी व देविदास कडू युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर, भाजपाचे गटनेते देविदास कडू, माजी शहर अध्यक्ष अरुण लाड, राजेंद्र चौहान, बाबा शेट्टी, दादा धुमाळ, ज्येष्ठ नेते सुभाष सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, मनसेचे लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, सुधीर पारिठे, संतोष गुप्ता, जितेंद्र राऊत, ॲड. अविनाश पवार, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, अर्पणा बुटाला, जयश्री आहेर, मंदा सोनवणे, सुषमा देविदास कडू, अश्विनी जगदाळे, अरुण जोशी, पांडुरंग तिखे, दत्तात्रेय तांदळे, दीपक कांबळे, राजू परदेशी, जयप्रकाश परदेशी, प्रथमेश पाळेकर, शुभम मानकामे, सुनील भाऊ खिल्लारे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या