डॉक्टर आणि सीए दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे डॉक्टर्स व चार्टर्ड अकाउंटंटचा सन्मान

लोणावळा : दरवर्षीप्रमाणे एक जुलै रोजी डॉक्टर दिन आणि चार्टर्ड अकाउंटंट दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे विविध चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंटचा सन्मान करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत साधू वासवानी चॅरिटेबल हॉस्पिटल, खंडाळा येथील डॉ. निकिता कोठारी, डॉ. आलिया सय्यद, डॉ. मोतीवाला (ईएनटी), डॉ. शेरॉन मार्टिया. एल अँड टी हॉस्पिटल येथील डॉ. मयूर काळे, नारायणीधाम हॉस्पिटल येथील डॉ. वैष्णवी, डॉ. योगेश वायल. फिजिओथेरपी सेंटर येथील डॉ. भाग्यश्री, डॉ. सुधीना, डॉ. कात्यायनी. सीज फायर फाउंडेशन येथील डॉ. देवेश्री बागडे तसेच चार्टर्ड अकाउंटंट श्री. कालेकर यांचा गौरव करण्यात आला.
या सामाजिक उपक्रमात नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन विजया कल्याण, रोटेरियन नितीन कल्याण, आय.पी.पी. नारायण शेरवाले, पी.पी. धीरूभाई कल्याणजी, पी.पी. रवींद्र कुलकर्णी, पी.पी. पुंडलिक वानखेडे, पी.पी. नलवडे, ए.जी. मेहता आणि पी.पी. दिलीप पवार यांची उपस्थिती होती. या उपक्रमामुळे समाजात आरोग्य व वित्त क्षेत्रातील तज्ञांचा सन्मान वाढवण्याबरोबरच, त्यांच्या कार्याची दखल घेत प्रेरणादायी संदेश देण्याचे काम रोटरी क्लबने केले आहे.