Lonavala Rain Information l लोणावळा शहरात 10 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 45 मिमी पावसाची नोंद
लोणावळा : मागील चार पाच दिवसापासून कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने 10 ऑगस्ट पासून पुन्हा शहरात जोर धरण्यास सुरुवात केली आहे. 10 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात शहरात 45 मिमी (1.77 इंच) पावसाची नोंद करण्यात आली. आजही सकाळपासून हलक्या स्वरूपात पाऊस सुरू आहे.
लोणावळा शहरात यावर्षी आज अखेरपर्यंत 4692 मिमी (184.72 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेरपर्यंत 3935 मिमी (154.92 इंच) पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यंत जवळपास 30 इंच अधिकचा पाऊस झाला आहे. पावसाचे आजुन दोन महिने शिल्लक असल्याने यावर्षी पाऊस अडीच इंचाच्या पुढे जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



















