Breaking news

केंद्र शासनाच्या नक्शा पोर्टल सह माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे जिल्हाधिकारी रायगड यांच्या हस्ते उद्घाटन

खोपोली : खोपोली नगरपरिषद अंतर्गत माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून खोपोली शहरात रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते इलेक्ट्रिकल दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी ईव्ही चार्जिंग स्टेशनचे  खोपोली फायर स्टेशन येथे उद्घाटन करण्यात आले. तसेच बांबू रोपांच्या रोप वाटिकेचे जून्या मुंबई पूणे हायवे शेजारी आणि कापडी पिशवी वेंडिंग मशीनचे खोपोली नगरपरिषद कार्यालय इमारतीचे आवारात उद्घाटन संपन्न झाले. या पर्यावरण पूरक उपक्रमांचा नागरिकांनी लाभ  घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. 

     खोपोली नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात खोपोली नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकतीचे सविस्तर नगर भूमापन करून मिळकतीचे नकाशे व मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी केंद्र शासनाने कार्यान्वीत केलेल्या प्रकल्पाचा शुभारंभ आणि दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान त्याचप्रमाणे इतर योजनांची माहिती खोपोलीतील महिला बचत गटांना जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या उपस्थितीत देण्यात आली. पीएम स्वनिधी योजने अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला बचत गटांचा सन्मान केला गेला त्याचसोबत महिलांनी बचत गटांच्या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी रायगड जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी, उपसंचालक भूमि अभिलेख कोकण प्रदेश मुंबई अनिल माने,  जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड सुनील इंदलकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख खालापूर प्रमोद  जरग, खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी  डॉ. पंकज पाटील आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या

Sangmeshwar l राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील; छत्रपती संभाजी स्मारक भव्य दिव्य करण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाने अभ्यास करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार