निधनवार्ता l लोणावळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुनील इंगुळकर यांचे निधन

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुनील नाना इंगुळकर यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. लोणावळा नगर परिषदेचे कार्यक्षम नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. वलवन नांगरगाव प्रभागाचे नेतृत्व करत असताना त्यांनी या भागामध्ये केलेली कामे आज देखील नागरिकांच्या कायम स्मरणात आहेत. लोणावळा नगरपरिषद सेवक सहकारी वर्ग पतसंस्थेचे देखील ते चेअरमन होते. कोरोना काळामध्ये मोठ्या आजारावर मात करत ते ठणठणीत बरे झाले होते. मागील चार-पाच दिवसापूर्वी त्यांना थोडासा त्रास होऊ लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या आजारातच त्यांचे निधन झाले आहे. आज रात्री साडेआठ वाजता वलवण गावातील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.