Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळा शहरात 18 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 18 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मंगळवारी 18 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात शहरात 18 मिमी पावसाची नोंद झाली. यावर्षी आज अखेर लोणावळा शहरामध्ये 4987 मिमी (196.34 इंच) पाऊस चालू आहे. मागील वर्षी आज अखेरपर्यंत 4378 मिमी (172.36 इंच) पाऊस झाला होता.

मागील आठवडाभरापासून लोणावळा शहरामध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पुन्हा पाऊस सक्रिय होऊ शकतो.

इतर बातम्या

कर्ज देण्याच्या बहाण्याने बुटाला परिवाराने आमच्या घराचे खरेदीखत केल्याचा रांगणे परिवाराचा आरोप; कायदेशीर दस्तेवज करून घर विकत घेतल्याचा बुटाला परिवाराचा खुलासा

ठोंबरेवाडी लोणावळा येथील बंगल्यातील माळ्यातला घराबाहेर काढण्यासाठी बाऊन्सरचा वापर; नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सकाळपासून पोलीस ठाण्यात ठिय्या तरी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ