Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळ्यात पावसाचा जोर ओसरला - 7ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात जेमतेम 29 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरांमधील पावसाचा जोर मागील दोन-तीन दिवसापासून काहीसा कमी झाला आहे. 7 ऑगस्ट 2026 रोजी लोणावळा शहरामध्ये 24 तासात जेमतेम 29 मिमी पावसाची नोंद झाली आहे. काही भागांमध्ये अधून मधून पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या.

लोणावळा शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत 4611 मिमी (181.54 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज अखेर पर्यंत लोणावळा शहरामध्ये 3907 मिमी (153.82 इंच) पाऊस झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल 28 इंच जास्त पाऊस शहरांमध्ये झालेला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे व लवकरात लवकर रस्ते खड्डे मुक्त करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.

इतर बातम्या