Breaking news

तळेगावचा श्रीरुप जगताप माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा

मावळ (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तळेगाव दाभाडे येथील माऊंट सेन्ट हायस्कूल मधील चि. श्रीरूप प्रशांत जगताप याने 298 पैकी 276 गुण संपादन करून सीबीएससी आयबीएससी विभागात महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक मिळवला. यापूर्वी इयत्ता पाचवीत असताना झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला होता. श्रीरूपच्या या यशाने तळेगावच्या शैक्षणिक नावलौकिकात भर टाकलेली आहे. गणित विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून तो राज्यात सर्वप्रथम आला आहे. त्याला उत्कर्ष प्रबोधिनीचे विपुलकुमार भुसारे यांनी मार्गदर्शन केले.    

        शिष्यवृत्ती परीक्षा ही अतिशय कठीण परीक्षा असून ती स्पर्धा परीक्षेचा पाया मानली जाते. सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी व विविध क्लुप्त्यांचा वापर यामुळे हे यश संपादन झाले असे श्रीरुप याने सांगितले. नुकत्याच झालेल्या मंथन परीक्षेतही तो राज्य गुणवत्ता यादीत आला होता. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत तो तळेगावच्या नावलौकिकात सातत्याने भर टाकत आहे.

     श्रीरूपची आई वडगाव जवळील केशवनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षिका असून महाराष्ट्र राज्य मराठी निबंध स्पर्धेत त्यांनीही यापूर्वी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. श्रीरूप हा आदर्श मुख्याध्यापक स्व. जनार्दन माळी सर यांचा नातू असून त्याला शैक्षणिक वारसा त्याच्या कुटुंबातूनच लाभलेला आहे.

     श्रीरूपच्या या यशाबद्दल मावळ विधानसभेचे आमदार सुनील आण्णा शेळके, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अशोक शेलार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक सत्यम खांडगे, अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहूमामा शेलार, माजी नगरसेवक पोपटराव भेगडे, शिक्षक नेते राजू भेगडे, युवा नेते सुहास माळी, योगेश माळी यांनी अभिनंदन केले आहे.

इतर बातम्या

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने दरडग्रस्तांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला मंत्री महाजनांच्या तातडीच्या सूचना