Breaking news

निगडे येथील पूरग्रस्त ठाकर कुटुंबातील मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने स्विकारली

लोणावळा : मावळ तालुक्यातील निगडे येथील कै. रामदास सखाराम ठाकर यांच्या कुटुंबावर 5 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनीलअण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.

    पुराच्या पाण्यात वाहून जाऊन कै. रामदास ठाकर यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 7 वर्षांचा मुलगा साहिल आणि 5 वर्षांचा मुलगा मयूर असा परिवार आहे. घरातील एकमेव आधार हरपल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ठाकर कुटुंबातील दोन्ही लहान मुलांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य देण्यात आले असून त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी देखील संघटनेमार्फत स्वीकारण्यात आली आहे.

     यासोबतच संघटनेचे पदाधिकारी श्री. शाम पवार यांच्या वतीने कुटुंबाला तातडीची 5000 रुपये आर्थिक मदत देखील देण्यात आली. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सुशांत बालगुडे म्हणाले, "आमदार सुनीलअण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना मावळ तालुक्यातील कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू देणार नाही. घराचा कर्ता हरपला असला तरी समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. या दोन चिमुकल्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. ठाकर कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून तातडीची मदत मिळावी, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संकटाच्या काळात समाजाने एकत्र येऊन पूरग्रस्त कुटुंबाला आधार देण्याची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

    यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत बालगुडे, शाम पवार, उपसरपंच गणेश भांगरे, पवन मावळ अध्यक्ष आशुतोष धामणकर, निशांत बालगुडे, अक्षय धामणकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या

दरड कोसळलेल्या पाटण गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दरड पडण्याच्या धोक्याने नागरिकांना गाव खाली करायला लावले मात्र प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था झाली नाही - नागरिकांचा आरोप