Breaking news

तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी मातीचा खराळ वाहून आला; तुंग गावठाणाला धोका कायम

लोणावळा : तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी मातेचा एक मोठा भाग गावठाणाच्या बाजूला वाहून आला आहे. सुदैवाने यामध्ये कोणती हानी झाली नसली तरी तुंग गावठाणाला यामुळे धोका निर्माण झाला आहे.

मावळ तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व सोबतच वेगाने वाहणारे वारे यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे व डोंगर भागातून माती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून येण्याचे प्रकार घडले आहेत. तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी देखील अशीच घटना घडली आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी तुंग गावाचे गावठाण आहे. मातीचा भराव वाहून आल्यामुळे तुंग गावाच्या गावठाणला देखील धोका निर्माण झाला आहे. सुदर्शन पाठारे, अकिब शेख, आतिश पठारे यांनी ही घटना समक्ष पाहिली आहे. सुदर्शन पठारे म्हणाले शासनाने या घटनेची दखल घ्यावी व लवकरात लवकर या ठिकाणी उपाय योजना कराव्यात.

इतर बातम्या