Breaking news

लोणावळा शहरातील पूरग्रस्त नागरिकांना शासनाची 10 हजार रुपये आर्थिक मदत प्राप्त होणार

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये 6 जुलै 2026 रोजी पूर परिस्थिती निर्माण होऊन शहराच्या विविध भागातील जवळपास 1983 कुटुंब बाधित झाली होती. तीन महिने झाले तरी शासनाची कोणतीही मदत या पूरग्रस्तांना प्राप्त न झाल्या बाबत लोणावळा शहरातील पत्रकारांनी लोणावळा नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर शासनाकडून प्राप्त झालेली आर्थिक मदत पूरग्रस्तांना त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय झाला असून दसरा झाल्यानंतर ही मदत सर्व बाधित कुटुंबांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

साधारणपणे प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच टाटा कंपनीकडून जी मदत पूरग्रस्तांना दिली जाणार आहे ती देखील दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, आरोग्य समिती सभापती धनंजय काळोखे, नगरसेवक सनी घोणे, नगरसेवक मुकेश परमार, निखिल कवीश्वर, स्वप्ना कदम आधी यावेळी उपस्थित होते.

इतर बातम्या