समस्त महाजनी ट्रस्ट च्या वतीने मुक जनावरांच्या वैद्यकीय उपचारासाठी दोन रुग्णवाहिका भेट

मावळ माझा न्युज नेटवर्क : समस्त महाजनी ट्रस्ट च्या वतीने मुक जनावरांच्या वैद्यकीय उपचारासाठी दोन रुग्णवाहिका दिल्ली सरकारला भेट देण्यात आल्या आहेत. दिल्ली मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यामुळे समस्त महाजनी ट्रस्ट च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते या दोन्ही रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. 27 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे या रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या. नंतर त्या दोन्ही रुग्णवाहिका गौसेवेसाठी रवाना करण्यात आल्या.
या उद्घाटन प्रसंगी समस्त महाजन ट्रस्ट विश्वस्त परेशभाई शहा, प्रकाश पोरवाल, जिग्नेश भाई शहा व मित्तल आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश पोरवाल यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये एकूण 25 रुग्णवाहिका सरकारला दाण्याचा ट्रस्ट चा मानस आहे. या रुग्णवाहिकेमध्ये 24 तास डॉक्टर उपलब्ध असणार आहे. तसेच संपूर्ण ऑपरेशनची व्यवस्था, ओपीडी त्यामध्ये उपलब्ध असेल सदर कार्यामुळे दिल्ली मधील पशुपक्षींना वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार आहे व जीव रक्षणासाठी मोठे कार्य त्यामुळे शक्य होईल. सदर कार्यक्रमासाठी दिल्लीचे राष्ट्रीय सेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांनी मोलाचे सहकार्य लाभले.