Breaking news

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे “वीर वंदना – स्वस्थ चेतना” उपक्रम उत्साहात संपन्न

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने “वीर वंदना – स्वस्थ चेतना” हा देशभक्ती व सामाजिक जनजागृतीपर उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत “राखी फॉर नेशन” आणि “नशामुक्त भारत अभियान” राबविण्यात आले.

         कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक सागर आरगडे (लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पुणे) तसेच नंदा दीदी, प्रतिनिधी, ब्रह्माकुमारी राजयोग मेडिटेशन सेंटर, लोणावळा उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवा, व्यसनमुक्त जीवनशैली व मूल्याधिष्ठित जीवनाचे महत्त्व सांगितले. उपक्रमात विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांसाठी राख्या व शुभेच्छापत्रे तयार केली. तसेच नशामुक्त भारताची सामूहिक शपथ घेऊन व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प करण्यात आला.

      कार्यक्रमास एसटीईएस कॅम्पस संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, सर्व विभागप्रमुख, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी NSS च्या विद्यार्थिनी स्वयंसेविकांनी प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर तसेच एसटीईएस कॅम्पसच्या सुरक्षा रक्षकांना राखी बांधून त्यांच्या सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा भावनिक क्षण उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला. या उपक्रमाचे आयोजन NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. जी. दबडे व प्रा. एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

इतर बातम्या