सन्मान कर्तव्यनिष्ठतेचा l गावात दरोडा टाकलेल्या दरोडेखोरांना पकडणाऱ्या पोलिसांचा ग्रामस्थांकडून सन्मान

आळंदी (अर्जुन मेदनकर): पुणे जिल्ह्यातील बहुळ आणि चिंचोशी गावात दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या झोन 3 चे उपायुक्त (डीसीपी) डॉ. शिवाजीराव पवार आणि त्यांच्या सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चऱ्होली बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला खडकी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुनिल झपे, चेअरमन सुरेशभाऊ तात्याबा तापकीर, शांताराम आप्पा बबनराव तापकीर, चंद्रकांत पंढरीनाथ तापकीर, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोळक, शहाजी तापकीर, बाळासाहेब किसन तापकीर, ज्ञानेश्वर राणू तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
गावाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.