Breaking news

Breaking News l लोणावळ्यातील भुशी धरणात 2 तरुण बुडाले; शोध मोहीम सुरू

लोणावळा : लोणावळ्यातील पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेल्या भुशी धरण्यात मित्रांसोबत पर्यटन व वर्षाविहासाठी आलेल्या उत्तर प्रदेश येथील दोन तरुण पर्यटक बुडाली आहेत. ही घटना आज रविवारी (8 जून) दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. 

     जमाल व साहिल (दोघेही रा. उत्तर प्रदेश, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी भुशी धरण्याच्या बॅक वॉटर येथे बुडालेल्या दोन्ही पर्यटकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह लोणावळा शहर पोलीस कर्मचारी तसेच शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथक व स्थानिक युवक घटनास्थळी दाखल झाले असून धरणाच्या पाण्यात बुडालेल्या दोन्ही युवकांचा शोध सुरू आहे.

इतर बातम्या