Lonavala Shivrajabhishek l लोणावळा शहरामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला लहान मुलांच्या हस्ते विधिवत मंत्र उपचारांमध्ये अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पूजाअर्चा करण्यात आली. शिवराज्याभिषेक समिती लोणावळा, हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसर, सकल हिंदू समाज लोणावळा यांच्या वतीने या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी दहा वाजता विधिवत पुरोहितांच्या उपस्थितीमध्ये मंत्रोपचार म्हणत महाराजांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी लोणावळा शहर व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व अभिषेकाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. आलेल्या सर्व नागरिकांना व छत्रपती शिवाजी महाराज चौक व परिसरातील नागरिकांना यानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळच्या सत्रामध्ये आनंद उत्सवाचे आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व परिसराला फुलांचे आकर्षक डेकोरेशन करण्यात आले होते.