Pawna Dam l पवना धरण क्षेत्रात 6 जुलै रोजी 24 तासात 426 मिमी पाऊस; धरणात 55 टक्के पाणीसाठा
लोणावळा : मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवन मावळातील पवना धरण क्षेत्रात 6 जुलै रोजी 24 तासात 426 मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्या चांगलीच वाढ झाली आहे. धरणात 55 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर कासारसाई हे धरण भरल्याने धरणातून 6 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
लोणावळा व मावळ परिसरात 5 व 6 जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे धरण साठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.






















