मोठी बातमी l लोणावळा शहर पोलीस स्टेशन समोरील दुकानात मंगळवारी रात्री चोरी; रोख रक्कम व सोन्याचा ऐवज चोरला

लोणावळा : लोणावळा शहरांमधील डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर सोमवारी रात्री दरोडा पडला होता या घटनेला जेमतेम 24 तास देखील उलटलेले नसताना पुन्हा एकदा लोणावळा पोलीस स्टेशन समोर येईल पैठणी या साडी दुकानांमध्ये चोरीची घटना घडली आहे तसेच सोनी इलेक्ट्रॉनिक या दुकानांमध्ये देखील चोरीचा प्रयत्न झाला आहे. लोणावळा शहरांमधील मध्यवर्ती भागामध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी मध्यरात्रीनंतर पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास डॉक्टर खंडेलवाल यांच्या प्रधान पार्क येथील बंगल्यामध्ये 20 ते 22 जणांनी सशस्त्र दरोडा घातला होता यामध्ये घरामधील सोने व हिऱ्याचे ऐवज तसेच रोख रक्कम असा साडेअकरा लाख रुपयांचा मुद्द्यामाल दरोडेखोरांनी पळवला आहे. विशेष म्हणजे दरोडा टाकून दरोडेखोर त्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या मागे जेमतेम 15 ते 20 फुटावर पोलीस गाडी होती तरी देखील एकही दरोडेखोर पकडण्यात यश आलेले नाही. या घटनेमुळे लोणावळा शहरात सर्वत्र संताप व्यक्त होत असताना पुन्हा मंगळवारी रात्री लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या समोर गुरुद्वाराच्या व संजीवनी हॉस्पिटलच्या समोर असलेल्या पैठणी या कपड्याच्या दुकानांमध्ये चोरीची घटना घडली आहे दुकानांमधील रोख रक्कम व सोन्याचा ऐवज असा मुद्देमाल यामध्ये चोरीस गेला आहे. गुरुद्वाराच्या खाली असलेल्या सोनी इलेक्ट्रॉनिक या दुकानात देखील चोरीचा प्रयत्न झाला आहे. पोलीस स्टेशन पासून अगदी 100 मीटर अंतरावर या चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने या सर्व घटनांचा तात्काळ तपास करत चोरट्यांना व दरोडेखोरांना अटक करावी अशी मागणी केली आहे.