लोणावळ्यातील डॉ. गणेश खांडेकर यांना पीएचडी पदवी प्रदान

लोणावळा : एसकेएन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्सेस, लोणावळा येथील अभियांत्रिकी विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. गणेश खांडेकर यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. ही पदवी त्यांना इंदूर येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यापीठातून भौतिकशास्त्र शाखेत मिळाली आहे.
“नॅनो-फेज्ड मटेरियल्स अॅण्ड थिन फिल्म्स फॉर एफिशिएंट सोलर एनर्जी कन्व्हर्जन” या विषयावर त्यांनी संशोधन करून पीएच.डी. प्रबंध सादर केला. या संशोधनासाठी त्यांना मार्गदर्शन डॉ. ओ. एम. प्रकाश चौधरी यांचे लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सिंहगड टेक्निकल एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्षा डॉ. रचना नवले-अष्टेकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. संस्थेच्या लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, प्राचार्य डॉ. एम. एस. रोहकले तसेच इतर विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही डॉ. खांडेकर यांचे यशस्वी कार्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.