Breaking news

Lonavala News l लोणावळ्यात सुरू असलेल्या शिवस्मारकासंदर्भात मनसेची प्रशासनाकडे महत्वपूर्ण मागणी

लोणावळा : शहरात सध्या सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या आजूबाजूला किमान दोन फूट मोकळी जागा ठेवावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोणावळा शहराध्यक्ष श्री. निखिल हनुमंत भोसले यांनी केली आहे. त्यांनी लोणावळा नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी यांना यासंदर्भात एक अधिकृत निवेदन सादर केले आहे.

      या निवेदनात भोसले यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या बांधकाम सुरू असलेले शिवस्मारक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आहे व त्याच्या चोहोबाजूंनी रस्ता असल्याने त्या परिसरात काही नियमावली निश्चित करणे आवश्यक आहे. स्मारकाच्या भिंतीला लागून कोणतीही वाहने पार्क होऊ नयेत, लोकांनी स्मारकाच्या भिंतीला टेकून उभे राहू नये, तसेच पश्चिम बाजूला असलेल्या व्यापाऱ्यांनी आपले साहित्य भिंतीलगत ठेवू नये, यासाठी स्मारकाच्या चारही बाजूंनी किमान दोन फूट अंतर ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. भोसले यांनी या जागेत छोट्या फुलझाडांची बाग विकसित करण्याचाही प्रस्ताव दिला असून, यामुळे स्मारक परिसर अधिक आकर्षक आणि सुंदर दिसेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

     मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या या सूचनेचा प्रशासनाने सकारात्मक विचार करावा आणि त्वरित कार्यवाही करावी, अशी नम्र मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

इतर बातम्या

पोलिसांच्या डोळ्यासमोर दरोडेखोर पळाले; … पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करा - लोणावळ्यातील सर्व पक्षीय नेत्यांची मागणी