Breaking news

Accident News l लोणावळा कुणेगाव हद्दीत रस्ते अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

लोणावळा : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुणेगाव ते समरहील या रस्त्यावर शुक्रवारी 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या रस्ते अपघातात एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.

कुणेगाव ते समर हिल या रस्त्यावर एका मिनी प्रवासी बसच्या मागे एक दुचाकी चालली होती. अचानक समोरच्या बसने ब्रेक मारल्यामुळे दुचाकी बसला मागून धडकली व सदरचा दुचाकी चालक गाडीवरून खाली पडला. यावेळी समोरून येत असलेल्या पाण्याच्या टँकरच्या मागील चाकाखाली सदरचा दुचाकी चालक पडल्यामुळे हा भीषण अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण रुपेश बेरनाथ वाघमारे (वय १८, रा. कातकरी वस्ती, कुणेगाव, ता. मावळ, जि. पुणे) हा काल दुपारी पावणेतीनच्या सुमारास आपली स्कुटी (क्र. MH 14 MB 3336) घेऊन कुणेगाव ते खंडाळा-लोणावळा रस्त्यावरून जात असताना हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर कुणेगाव येथील आदिवासी बांधवांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांकडून नुकसान भरपाई भेटेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्र घेतला. हे समजल्यावर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आले व त्यांनी सर्व संबंधितांना समजावल्यानंतर सदरचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. अपघाताची ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. व त्या फुटेजवरून या अपघाताच्या घटनेचा अंदाज येत आहे. या अपघाताच्या घटनेचा पुढील तपास लोहा शहरचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


इतर बातम्या