Breaking news

समाजसेवेचा सुंदर उपक्रम l डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती अनुजा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि अनाथाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वडगाव मावळ : डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती अनुजा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने समाजसेवेचा आदर्शवत उपक्रम राबवण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि नजिकच्या अनाथाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली.

     अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. आरोग्य तज्ज्ञ व डॉक्टरांच्या देखरेखीखाली हे शिबिर सुरळीत पार पडले. या दिवशी दुसरा उपक्रम म्हणजे नजिकच्या अनाथाश्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या. विद्यार्थ्यांनी मुलांशी संवाद साधला, खेळ खेळले आणि काही वेळ त्यांच्यासोबत घालवला, ज्यामुळे त्या निरागस चेहऱ्यांवर हास्य फुलले.

      या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्ये, सहकार्य, संवेदनशीलता व समाजाभिमुख दृष्टिकोन विकसित होतो, असे प्रतिपादन श्रीमती अनुजा पाटील यांनी केले. “वाढदिवस म्हणजे केवळ सेलिब्रेशन नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी असते,” असे भावनिक उद्गार  त्यांनी यावेळी काढले. या दोन्ही उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्राचार्य डॉ. सुरेश शिरबहादूरकर, डीन डॉ. योगेश गुरव, प्राध्यापक डॉ. राहुल देशमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,  आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

इतर बातम्या