Breaking news

मावळ तालुक्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जोरदार झटका; अनेक पदाधिकाऱ्यांचे शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ शिवसेने मध्ये जोरादार इन्कमकिंग सुरु झाली असून शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व मावळ लोकसभा चे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थित आंदर मावळ व नाणे मावळ मधील पदाधीकारी मदन शेडगे, तालुका संघटक उप तालुका प्रमुख सोमनाथ कोंडे, आंदर मावळ संघटक रमेश नगरकर,  विभाग प्रमुख अनंत आंद्रे, उपविभाग प्रमुख आनंद जांभळे, उपविभाग प्रमुख हनुमंत ठाकर, कुसूर शाखा प्रमुख श्रीपत तुर्डे, घोणशेत शाखा प्रमुख कैलास खरमारे, यांच्यासह कामशेत शहर येतील उभाठा चे उपशहर प्रमुख सुदेश लाड, उप शहर प्रमुख वैभव हजारे व काँग्रेस युवक चे अध्यक्ष राजेश वाघोले व राष्ट्रवादी सेल औद्योगिक विभाग अध्यक्ष नवनाथ हारपुडे, उपसरपंच ईश्वर वाघोले व संकेत जाधव यांनी प्रवेश केला आहे. मागील आठवड्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेल्या लोणावळा येथील माजी नगरसेविका कल्पना आखाडे, सिंधु परदेशी, उपशहर प्रमुख प्रकाश पाठारे, उपशहर प्रमुख विजय आखाडे, महिला आघाडी उप शहर प्रमुख प्रिया पवार, अनिताताई गायकवाड यांचा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अधिकृत प्रवेश करून घेण्यात आला. 

     यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, युवासेना उप प्रमुख दत्ता केदारी, महिला आघाडी प्रमुख शुभांगी कळंगे, महिला आघाडी प्रमुख शीलाताई भोंडवे, देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर व उपतालुका प्रमुख राम सावंत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब व मावळ तालुक्याचे संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आगामी काळात देखील मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार आहेत.

इतर बातम्या

समाजसेवेचा सुंदर उपक्रम l डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती अनुजा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि अनाथाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप