Breaking news

वेहेरगाव सामुदायिक विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांचा विवाह उत्साहात संपन्न; वरुण राजाची देखील हजेरी

लोणावळा : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने वेहरगाव येथील आई एकवीरा पायथा मंदिर परिसरात आयोजित सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मावळ तालुक्यातील दहा कुटुंबांतील पाच वधू-वरांचे शुभविवाह या सोहळ्यात संपन्न झाले. यंदा या सामुदायिक विवाह सोहळ्याचे तिसरे वर्ष होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता साखरपुडा सोहळ्याने झाली. त्यानंतर दुपारी 12 वाजता हळदी समारंभ झाला. सायंकाळी 05.10 मिनिटांनी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. नववधूंना सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, नथ, पैंजण, जोडवी, मनगटी घड्याळ, साखरपुडा साडी आणि लग्नाचा शालू देण्यात आला. तसेच संसारोपयोगी वस्तूंचीही भेट देण्यात आली. वरांना साखरपुडा आणि लग्नाचे पोशाख तसेच घड्याळ देण्यात आले. वरपक्षाची मिरवणूक बँड पथक आणि रथाच्या गजरात निघाली.

भोजन व्यवस्थेची जबाबदारी मुरारीलाल शर्मा यांनी सांभाळली. कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, एकवीरा देवस्थान अध्यक्ष दीपक हुलावळे, संदीप वाघिरे, पंढरीनाथ ढोरे, गणपत भानुसघरे, मिलिंद बोत्रे, बाळासाहेब भानुसघरे, जितेंद्र बोत्रे, मधुकर पडवळ, विजय देशमुख, दत्तात्रय पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष अशोक पडवळ, कार्याध्यक्ष नितीन देशमुख, मानद अध्यक्ष सचिन भानुसघरे, संस्थापक व माजी सभापती शरद हुलावळे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे तसेच चंद्रकांत शेलार, संतोष केदारी, संदीप तिकोणे, भाऊसाहेब हुलावळे, अमोल भेगडे, सुनिल गरुड, मुरारीलाल शर्मा, मच्छिंद्र केदारी, मंगेश हुलावळे, नितीन वाडेकर, विशाल जमदाडे, सीमा आहेर, दिलीप खेंगरे, सोमनाथ सावंत, भाऊसाहेब मापारी, संदीप भानुसघरे, शंकर पडवळ, नवनाथ कोंडभर, सुनिल गायकवाड, खंडु शेलार, शांताराम ढाकोळ, भगवान देशमुख, शेखर दळवी, खंडु आहेर, बबन गरुड, उल्हास दळवी यांनी केले.

     प्रास्ताविक शरद हुलावळे, सायली बोत्रे, सचिन भानुसघरे आणि अमोल भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन शांताराम ढाकोळ, भाऊसाहेब हुलावळे, संदीप तिकोणे आणि शंकर पडवळ यांनी केले.


इतर बातम्या

समाजसेवेचा सुंदर उपक्रम l डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती अनुजा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि अनाथाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप