Breaking news

लोणावळ्यातील टाटा कंपनीच्या कार्यालयाबाहेर नगरसेवकांचा ठिय्या मोर्चा; टाटाने पूरग्रस्तांना मदत न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये सहा जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होत 2000 कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. लोणावळा शहरातील टाटा कंपनीच्या मान्सून लेक मधून मोठ्या प्रमाणात लोणावळा शहरात पाणी घुसल्यामुळे ही पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप लोणावळा नगरपरिषदेने केला आहे. आमदार सुनील शेळके यांच्या आढावा बैठकीमध्ये टाटा कंपनीने देखील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. या घटनेला जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी देखील टाटा कंपनीकडून पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची मदत उपलब्ध झालेली नाही. टाटा कंपनी केवळ आश्वासने देत चालढपणा करत असल्याचा आरोप करत लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू व सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी नागरिकांना सोबत घेत टाटा कंपनीच्या कार्यालयाला टाळी ठोकण्याचा इशारा दिला होता. गुरुवारी 20 ऑगस्ट रोजी सकाळी लोकप्रतिनिधी व नागरिक टाटा कंपनीच्या कार्यालयाला टाळा लावण्यासाठी गेले मात्र पोलिसांनी आंदोलन करताना अडवल्यामुळे कार्यालयाला टाळा न लावता कार्यालयाच्या बाहेर बसून लोकप्रतिनिधींनी आंदोलन केले. 

     लोणावळा शहरामध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीला टाटा कंपनीच जबाबदार असल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त नुकसान भरपाई पूरग्रस्तांना द्यावी अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली आहे. लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून नुकसानग्रस्त नागरिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. दोन हजार नागरिकांचे या पूरपरिस्थितीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्याचा अहवाल शासनाला देखील पाठवण्यात आला आहे मात्र शासनाकडून देखील अद्याप कोणतीही मदत नागरिकांना प्राप्त झालेली नाही. काही सामाजिक संस्थांच्या वतीने नागरिकांना अन्नधान्य व अंथरून पांघरून व इतर जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले आहे. मात्र या पूर्व परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या कोणत्याही घटकांनी नागरिकांना कसलेही प्रकारची मदत केलेली नसल्यामुळे पूरग्रस्त नागरिकांमध्ये देखील संतापाची लाट निर्माण झाली आहे.

    मागील महिन्यात देखील टाटा कंपनीच्या विरोधात लोणावळा नगर परिषदेने सर्वपक्षीयांच्या वतीने आंदोलन केले होते. यावेळी मात्र केवळ लोकप्रतिनिधींनी नागरिकांना सोबत घेत हे आंदोलन केले असल्यामुळे यामध्ये इतर राजकीय पक्ष सहभागी झाले नाहीत. टाटा कंपनीने लोणावळा नगरपरिषदेला लेखी पत्र दिले आहे. नागरिकांच्या झालेल्या नुकसानी बद्दल आम्ही देखील खेद व्यक्त करतो. टाटा कंपनीच्या सीएसआर फंडामधून मान्यता मिळाल्यानंतर आवश्यक ती मदत आम्ही आठ दिवसांमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. टाटा कंपनीने दिलेल्या आश्वासनानंतर सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 

इतर बातम्या

लोणावळा दहीहंडी लोकोत्सव रौप्य महोत्सवी वर्ष l लोणावळा दहीहंडी लोक महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना आरोग्य संपदा राखण्यासोबतच व्यसनमुक्ती बाबत होणार जनजागृती

कर्ज देण्याच्या बहाण्याने बुटाला परिवाराने आमच्या घराचे खरेदीखत केल्याचा रांगणे परिवाराचा आरोप; कायदेशीर दस्तेवज करून घर विकत घेतल्याचा बुटाला परिवाराचा खुलासा

ठोंबरेवाडी लोणावळा येथील बंगल्यातील माळ्यातला घराबाहेर काढण्यासाठी बाऊन्सरचा वापर; नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सकाळपासून पोलीस ठाण्यात ठिय्या तरी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ