सिंहगड इन्स्टिट्यूट मधील डॉ. प्रसाद दत्तात्रय कुलकर्णी यांना पीएच.डी. पदवी प्रदान
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा येथील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील डॉ. प्रसाद दत्तात्रय कुलकर्णी यांनी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, माटुंगा, मुंबई येथून यशस्वीरित्या पीएचडी पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल SIT परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
डॉ. कुलकर्णी यांनी “Performance Analysis of Conical Fluid Film Journal Bearing Operating in Turbulent Flow Regime” या विषयावर संशोधन प्रबंध सादर करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांच्या संशोधनाला डॉ. व्ही. एम. फल्ले, अधिष्ठाता – संशोधन व विकास (R&D) यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. प्रसाद कुलकर्णी यांच्या या यशाबद्दल सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्ष डॉ. रचना नवले-अष्टेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
तसेच लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, SIT चे प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, यांच्यासह सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधन व शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. डॉ. कुलकर्णी यांची ही पीएच.डी. पदवी SIT लोणावळ्याच्या संशोधनाभिमुख शैक्षणिक वातावरणाला आणि अभियांत्रिकी संशोधनातील योगदानाला अधिक बळकटी देणारी ठरली आहे.



















