Breaking news

माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खंडाळा परिसरात वृक्षारोपण

लोणावळा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'वृक्ष पंधरवडा' उपक्रमांतर्गत खंडाळा परिसरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.

       नगरपालिका कर्मचारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने या हरित उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरामध्ये विविध प्रकारच्या बहुगुणी झाडांची लागवड करण्यात आली. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संवर्धन करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.

      या वृक्षारोपण कार्यक्रमास धनंजय टेमघरे, सुनील शंकर पवार, संतोष सुतक, रामदास वाघमारे, नितेश माडे, आर्यन कदम, दीपक शिंदे (मुकादम), धनेश सपकाळ आणि सचिन वाळके यांच्यासह नगरपालिका कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 

इतर बातम्या