Breaking news

Eye Check Up Camp l लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्स यांच्या वतीने खास विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिर संपन्न

लोणावळा : लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्स यांच्या वतीने व डॉ. सुहास हळदीपूरकर संचलित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आय हॉस्पिटल यांच्या सहयोगाने दिनांक १३ व १४ ऑक्टोबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डोळ्यांची तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमारे ४०० विद्यार्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. अल्प वयात विद्यार्थ्यांना दृष्टी दोष होण्याचे प्रमाण वाढत आहे व चष्मा लावण्याची गरज निर्माण होत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या संचालिका राधिकाताई भोंडे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते, शाळेचे शिक्षक व कर्मचारी, तसेच तसेच लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजंड्सच्या अध्यक्षा वैशाली साखरेकर, सचिव मीनाक्षी गायकवाड, खजिनदार नूतन घाणेकर, माजी अध्यक्ष उमा मेहता, सुरेश गायकवाड, राजेश मेहता, विवेक घाणेकर, गोरख चौधरी, विजय रसाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

इतर बातम्या