Breaking news

सूर साधना परिवाराच्या माधुरी दीक्षित विशेष कार्यक्रमाने अक्षय तृतीयेला मिळाली संगीतमय संध्या

लोणावळा : अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर सूर साधना गायन क्लासेसच्या वतीने एक आगळीवेगळी संगीतमय संध्याकाळ साजरी करण्यात आली. लोणावल्यातील महिला मंडळ हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या गाजलेल्या गीतांना सुरेल स्वरांनी रंगतदार सादरीकरण देण्यात आले.

      सदर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते रंगमंचावरील ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित यांचा भव्य कटआउट पोस्टर. दीपप्रज्वलन व गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर एकाहून एक सुंदर सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका मंगला राणे यांच्यासह दीपाली कांबळे, किरण कुलकर्णी, रमा सिनकर, सोनिया खोब्रागडे, मोनाली कुलकर्णी, संध्या होजगे, मोनिका मंडोल यांनी माधुरी दीक्षित यांची लोकप्रिय गाणी सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले. त्यांना साथ दिली ती वादक कलाकार – सुनील कडू, सुनील पानंगावकर, सिद्धांत कांबळे – आणि सूर साधनाचे संचालक प्रदीप वाडेकर यांनी.

     या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष नासीर शेख, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय भोईर, महिला आघाडी अध्यक्षा मनीषा भांगरे, उपाध्यक्ष विशाल पाठारे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, लायन्स क्लब लिजेंडचे अध्यक्ष गोरख चौधरी, तसेच राजेश मेहता, बापूलाल तारे, ज्येष्ठ पत्रकार सी. बी. जोशी, बुलंद मावळचे गणेश गवळी, बापू कुलकर्णी, बाळासाहेब लोहारे यांच्यासह अनेक महिलांनी आणि संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सूर साधना परिवाराचा हा उपक्रम संगीत आणि श्रद्धेच्या सुंदर संगमाचे उदाहरण ठरला.

इतर बातम्या

नगरपालिका बिल देत नसल्याचा निव्वळ कांगावा ! ठेकेदारांने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामासाठी वापरला निकृष्ट दर्जा दगड; तंबी देताच - कामगार लग्न सोहळ्याला गेले असल्याचे कारण देत थांबवले काम