Breaking news

तळेगाव येथील ‘ॲड. पु.वा. परांजपे विद्यामंदिर’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

तळेगाव दाभाडे : येथील नामांकित शिक्षण संस्था ‘ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर’ शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि योगासनांचे महत्त्व कळावे, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शाळेतील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. यावेळी सौ. आवटे मॅडम यांनी हास्य योगा ची प्रात्यक्षिके घेतली.

        या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी स्वप्निता भगत हिला आमंत्रित करण्यात आले होते. तिने उपस्थित विद्यार्थ्यांना योगाचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून दिले, तसेच दैनंदिन जीवनात योगासने केल्याने एकाग्रता कशी वाढते याबद्दलचे आपले अनुभव शेअर केले. याप्रसंगी शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक माननीय भोरे सर यांचेही विशेष स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक भोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा पहिलाच मोठा कार्यक्रम असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षक वर्गामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

       कार्यक्रमादरम्यान क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी, मुख्याध्यापकांनी आणि शिक्षक वृंदाने विविध योगासने व प्राणायाम केले. सामूहिक योगासनाने संपूर्ण शाळेचा परिसर मंत्रमुग्ध झाला होता. शेवटी, नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक भोरे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सुदृढ आरोग्यासाठी रोज योग करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

इतर बातम्या