Breaking news

Waksai News l ग्रुप ग्रामपंचायत वाकसई व फिटनेस क्लब वाकसई यांच्या वतीने रविवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोणावळा : लोणावळा शहरालगत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत वाकसई व फिटनेस क्लब वाकसई यांच्या वतीने रविवारी 21 जून रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.०० वाजता ही स्पर्धा तीन वेगवेगळ्या वयोगटांमध्ये सुरू होणार आहे. 

१) वयोगट १० ते १३ वर्ष - अंतर 2.5 किलोमीटर वाकसई फाटा ते करंडोली रिटर्न 

२) वयोगट 14 ते 16 वर्ष - अंतर पाच किलोमीटर धावणे 

३) वयोगट 17 ते पुढे खुलागट - अंतर वाकसई फाटा ते जेवरेवाडी रिटर्न 

     वरील तीन गटांमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सर्व वयोगटातील मुले व पुरुषांसाठी तसेच मुली व महिलांसाठी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक दिले जाणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोफत टी-शर्ट देण्यात येणार आहे तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.

इतर बातम्या