Breaking news

सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

तळेगाव दाभाडे : सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे संस्थापक गणेश भेगडे, संस्थेचे अध्यक्ष सुनील भेगडे, सचिव दत्तात्रय नाटक,  संचालक अरुण भेगडे, शालेय समिती अध्यक्ष रामराव जगदाळे, संचालक विलास भेगडे तसेच उद्योजक अतिश अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

       यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिशा जामदार हिने 93.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. प्रणिशा (93.20%) हिने द्वितीय, सार्थक बागुल (91.80%) याने तृतीय, ऋतुजा सोनार (91.20%) हिने चतुर्थ तर संदीप रात्रे (90.80%) याने पाचवा क्रमांक मिळविला.

विषयनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयात दिशा जामदार (92 गुण), हिंदी विषयात दिशा जामदार (91 गुण), मराठी विषयात साक्षी पाटील (95 गुण), गणित विषयात सार्थक बागुल (99 गुण), विज्ञान विषयात संदीप रात्रे (98 गुण) आणि सामाजिक शास्त्र विषयात सार्थक बागुल (97 गुण) यांनी विशेष प्रावीण्य मिळविले.

       यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

       कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमास पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्याध्यापिका रंजीता थंपी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या मनोगतात शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर्षीच्या दहावीच्या मुलांना मार्गदर्शनही केले.

इतर बातम्या