Breaking news

Shivsena News l लोणावळ्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ; संजय भोईर यांचा पाच हजार सदस्य नोंदणीचा संकल्प

लोणावळा : शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या औचित्याने शहरात शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

    यावेळी संजय भोईर यांनी आगामी एका वर्षात लोणावळा शहरात किमान पाच हजार नव्या सदस्यांची नोंदणी करण्याचा संकल्प केला. शिवसेनेचा विचार घराघरात पोहोचवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

      या कार्यक्रमास शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे, युवासेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे, माजी नगरसेविका सिंधुताई परदेशी, उपशहर प्रमुख विशाल पाठारे व विजय आखाडे, समन्वयक नंदूभाऊ कडू, सल्लागार पराग राणे, महिला आघाडी शहर संघटिका मनिषा भांगरे, उपशहर संघटिका प्रिया पवार, अनिता गायकवाड व दिपाली शिरंबेकर, युवासेना उपतालुका प्रमुख नितीन देशमुख, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे, विभाग प्रमुख प्रसन्न कन्नन, विभाग प्रमुख सहादू बडेकर, खंडू शेलार, शाखाप्रमुख परेश वावळे, श्याम भालेराव, नरेश ढोरे, चरण इंगुळकर, तसेच विविध विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     कार्यक्रमात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसह शहर पातळीवर पक्ष बळकट करण्याच्या विविध योजनांवरही चर्चा झाली.

इतर बातम्या