Breaking news

Mumbai Pune expressway l मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर औंढे पुलाजवळ शिवशाही बसचा अपघात

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर औंढे पुलाजवळ शिवशाही बसचा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार बसचा टायर फुटल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी शिवशाही बस विरुद्ध लेनवर पुणे दिशेला जाऊन डोंगराच्या कडेला धडकली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यामुळे पुण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच लोहगड कडे जाणारा रस्ता देखील बंद झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

इतर बातम्या