Breaking news

कामशेत परिसरात गांजा विक्री करणारा इसम जेरबंद!

लोणावळा : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मौजे दौंडे काॅलनी कामशेत येथे नागेश रुपेश लोंढे वय २० रा. भैरवनाथनगर मंदीरा जवळ कामशेत हा इसम अँक्टिव्हा दुचाकीवर संशयास्पद स्थितीत मिळुन आला असता  त्याच्या ताब्यातून एक किलो गांजा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, व प्लॅस्टिकच्या पिशव्या, असा  एकुण एक लाख रुपये किंमतीचा माल  जप्त करण्यात आला. आरोपीने सदरचा माल कोठुन आणला व कोणाकडून आणला या बाबत तपास करुन पुढील कारवाई करण्याकरीता कामशेत पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले.

      ही कामगिरी संदीपसिंह गिल सो. पोलीस अधीक्षक संदीपसिंह, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग शुभम कुमार, उपविभागीय पोलीस गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर स्थानिक गुन्हे शाखा उपनिरीक्षक अभिजीत सावंत, ग्रेड पोसई विनोद भोकरे, हवालदार संतोष शेळके, हवालदार सागर नामदास, हवालदार गणेश होळकर, हवालदार संतोष भापकर, हवालदार गणेश धनवे, हवालदार सिध्देश्वर पाटील,  हवालदार तुषार भोईटे स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांच्या पथकाने केली.

इतर बातम्या