Breaking news

लोणावळ्यात दोन हाय प्रोफाईल कारची धडक; वाहनांचे मोठे नुकसान

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा शहरात अंबरवाडी फाट्याजवळ दोन हाय प्रोफाईल कारची धडक आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाली. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी दोन्ही वाहनांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. रेंज रोव्हर व किया या दोन गाड्यांचा यामध्ये अपघात झाला आहे. 

      मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पेरू खरेदी करण्यासाठी रेंज रोव्हर गाडी उभी होती. यावेळी मागून भरता वेगात आलेल्या किया या आलिशान गाडीने रेंज रोवर गाडीला जोरात धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की यामध्ये रेंज रोव्हर गाडीचे मागील चाक निघून दूर जाऊन पडले. तर किया गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर किया गाडीमधील चालक व प्रवासी गाडीचे नंबर प्लेट काढून घेऊन निघून गेले. या अपघातामुळे काही काळ येथील वाहतूक झाली होती लोणावळा शहराच्या वाहतूक विभागाने अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

इतर बातम्या