Lonavala News l दुचाकी वरून आलेल्या चोरट्यांनी शतपावलीसाठी बाहेर गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले
लोणावळा : रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी रस्त्यावर फिरत असलेल्या एका 58 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पळवल्याची घटना पांगोळी येथे बुधवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पांगोळी येथील एक 58 वर्षीय महिला रात्रीचे जेवण झाल्यानंतर पांगोळी ते नारायण धाम दरम्यानच्या रस्त्यावर शतपावली करत असताना दुचाकीवरून तोंडाला मास्क लावून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या जवळ जाऊन गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोवारा केला. हे दोन्ही चोरटे अंदाजे 28 ते 30 वर्षाचे असून मंगळसूत्र त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने धूम ठोकली. लोणावळा शहरामध्ये यापूर्वी देखील चैन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.





















