Breaking news

टीसीएसमध्ये १२ विद्यार्थ्यांची निवड; सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळाचा गौरव

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लोणावळा कॅम्पसच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या यशस्वी प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. याच अनुषंगाने सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील बॅच 2025 मधील 12 विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या नामांकित आयटी कंपनीमध्ये निवड झाली आहे.

कॉम्प्युटर सायन्स विभागातील फर्दीन सलीम मुलाणी, प्रथमेश भानुसघरे, साक्षी योगेश भोसले, कुनालसिंग रंजीतसिंग परदेशी, मयूर दीपक गागरे, दर्शना बोरसे, किरण महादेव बडे आणि नेहा दोनेकर यांची ₹3.46 लाख वार्षिक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे. तसेच कॉम्प्युटर सायन्स विभागातील मुकुंद धुमाळ, स्वरूप गायकवाड आणि अर्जुन जोशी यांची ₹7.4 लाख वार्षिक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे.

याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागातील अनिकेत नामदेव राठोड यांची देखील ₹7.4 लाख वार्षिक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही भारतातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा व सल्लागार कंपनी आहे. सॉफ्टवेअर विकास, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, क्लाउड कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्यवसाय समाधान या क्षेत्रांमध्ये कंपनी जागतिक स्तरावर कार्यरत असून जगातील सर्वात विश्वासार्ह आयटी कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

या यशाचे श्रेय संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्ष डॉ. रचना नवले अष्टेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला देण्यात आले. त्यांच्या विद्यार्थी-केंद्रित धोरणांमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगाराच्या संधी सातत्याने वाढत आहेत. तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. मयूर राऊत यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य प्रकल्प अधिकारी एसटीईएसचे डॉ. एम. एस. गायकवाड, लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. शिवाजी देसाई, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य एस. एम. गायकवाड तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी त्याच्या मेहनतीचे कौतुक करत त्याला उज्ज्वल व यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या