Breaking news

सिंहगड संस्थेमधील दहावी व बारावी दोन्ही वर्गांचा शंभर टक्के निकाल; दहावी मध्ये सुयश माळी प्रथम तर बारावी मध्ये नताशा बियाणी प्रथम

लोणावळा : सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड पब्लिक स्कूल इयत्ता दहावीचा निकाल यावर्षी शंभर टक्के लागला आहे तसेच सिंहगड कॉलेजमधील इयत्ता बारावीचा देखील निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेची व महाविद्यालयाची 100 % निकालची परंपरा या वर्षी देखील कायम राहिली आहे.

      दहावीच्या मार्च 2025 परीक्षेमध्ये कु सुयश माळी याने 95 % गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु.समृद्धि वसेकर ही 93.60 % गुण मिळवून द्वितीय आली आहे. कु. अथर्व लाटणे हा 91.80 % गुण मिळवत विद्यालयात तृतीय आला आहे. तर बारावी सायन्स मधुन कु. नताशा बियानी 89 %मिळवत प्रथम आली आहे. कु.यथार्थ जोशी हा 86.20 % गुण मिळवत द्वितीय आला आहे. कु. सौरभ व्यवहारे हा 84.20 % गुण मिळवत तृतीय आला आहे. काॅमर्स मधुन कु. कौस्तुभ मालपोटे हा 67.40 % गुण मिळवत प्रथम आला आहे. कु. नैय्या जैन 63.40 % गुण मिळवत द्वितीय आली आहे. कु. रुद्र व्यास हा 63 % गुण मिळवत तृतीय आला आहे. 

      सिंहगड पब्लिक स्कूल मधून इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेसाठी 53 विद्यार्थी बसले होते व सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावी बोर्ड परीक्षेसाठी सायन्स व काॅमर्स मधुन 61 विद्यार्थी बसले होते आणि ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत. 

शाळेचे प्राचार्य एन. के. मिश्रा सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी या सर्वांच्या मेहनतीने मिळालेले हे यश आहे. संस्थेचे संस्थापक श्री. एम. एन. नवले सर, संस्थापक सचिव डॉ. सौ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष प्रशासक सौ. रचना नवले-अष्टेकर तसेच उपाध्यक्ष एच.आर. डॉ. श्री. रोहित एम. नवले या सर्वांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्गाचे अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर बातम्या