SSC RESULT l लोणावळ्यातील RK ACADEMY ची विद्यार्थिनी गौरी गणेश शिंदे दहावी मध्ये मावळ तालुक्यात प्रथम

लोणावळा : लोणावळा शहरांमधील आर के अकॅडमी मधील विद्यार्थिनी गौरी गणेश शिंदे हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये 99.20% गुण मिळवत शाळेसह संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. गौरी ही ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. ती लोणावळ्यातील आर के अकॅडमी मध्ये दहावीच्या अभ्यासक्रमाचा सराव करत होती. प्राध्यापक शिवाजी काळे सर यांनी 1993 साली लोणावळ्यामध्ये आर के अकॅडमी सुरू केली आहे. मागील अनेक वर्ष लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये टॉपर येणारे विद्यार्थी हे आर के अकॅडमीचे आहेत. आर के अकॅडमी म्हणजेच यशाची गुरुकिल्ली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोणावळा व परिसरातील हजारो विद्यार्थी आर के अकॅडमीचे विद्यार्थी आहेत.
आर के अकॅडमी मधील गौरी गणेश शिंदे हिने 99.20% गुण मिळवत ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल व मावळ तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. राज साठे याने 96.40 % गुण मिळवत व्हीपीएस कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. वेदिका राठोड व तनिष्का गायकवाड यांनी 95.40 % गुण मिळवत व्हीपीएस कॉलेजमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे. स्नेहा इंगवले हिने 94.20 % गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. यासह प्रणिती पवार 93.20%, वेदांती गरुड 93.20%, श्रावणी कुटे 92.20%, अमृता वाघमारे 91.20%, तन्मय गायकवाड 90.80%, अमृता गुंड 90.80%, प्रीती मराठे 90.60%, सृष्टी साबळे 90.60%.
लोणावळा शहरामध्ये मागील 32 वर्षांपासून आर के अकॅडमी मुलांना दहावी व बारावीचे प्रशिक्षण देत आहे. प्राध्यापक शिवाजी काळे सर व त्यांचा अनुभव संपन्न शिक्षक वर्ग यांच्या ज्ञानाचा विद्यार्थी वर्गाला मोठा फायदा होत आहे. यशाची गुरुकिल्ली म्हणून आर के अकॅडमी कडे पाहिले जाते. मागील काही वर्षांपासून लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये येणारे विद्यार्थी हे आर के अकॅडमीचे आहेत. या यशाबद्दल सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व आर के अकॅडमी चे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.