Breaking news

स्मशानभूमीच्या मागणीसाठी मळवली ग्रामस्थांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

लोणावळा : गावाची स्मशानभूमी असावी या मागणीसाठी मळवली गावातील युवकांनी आज मळवली येथे एक दिवशी लाक्षणिक उपोषण केले होते. 1995 साली मळवली येथील गायरानाच्या जागेवर स्मशानभूमी व दफन भूमीसाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. मात्र स्थानिक राजकारणामुळे या ठिकाणी अद्याप पर्यंत स्मशानभूमी झालेली नाही. मळवली गावामध्ये कोणाचा अंत्यविधी असेल तर तो कार्ला अथवा भाजे या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये घेऊन जाऊन करावा लागतो. मागील अनेक वर्षापासून ची गावातील स्मशानभूमीची ही समस्या प्रशासनाने लक्ष घालत सोडवावी अशी मागणी या उपोषणाच्या निमित्त करण्यात आली आहे. स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे या शेजारीच काही अतिक्रमणे झाली आहेत त्यामुळे येथे स्मशानभूमीची जागा ही अद्याप विकसित झालेली नाही. 

       जन्म आणि मृत्यू हे त्रिकाल बाधित सत्य असून प्रत्येकाला जीवनाची शेवटची यात्रा ही स्मशानभूमीतूनच करावी लागते याकरिता प्रत्येक गावामध्ये सुसज्ज स्मशानभूमी असावी अशी प्रत्येकाची अपेक्षा व मागणी असते. मळवली हे प्रसिद्ध असे रेल्वे स्टेशन व पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत असताना स्थानिक नागरिकांना स्मशानभूमी उपलब्ध न होणे ही शरमेची बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अनेक ठिकाणी जागा नसल्यामुळे स्मशानभूमी आहे उभ्या राहत नाहीत मळवली येथे शासनाची जागा ही स्मशानभूमीसाठी आरक्षित असून देखील त्या ठिकाणी स्मशानभूमी होत नाही स्थानिक राजकीय मंडळींनी राजकारण बाजूला ठेवत गावाचा हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे. प्रशासनाने देखील यामध्ये लक्ष घालावे व गायरानाच्या या जागेवर लवकरात लवकर स्मशानभूमी उभा राहील अशी मागणी मळवली ग्रामस्थांनी केली आहे.

इतर बातम्या