मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून दिशादर्शक फलक पडला राष्ट्रीय महामार्गावर; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

लोणावळा : खंडाळा येथे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून एक दिशादर्शक फलक वाऱ्याच्या झोक्यामुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पडला सुदैवाने या वेळेत राष्ट्रीय महामार्ग कोणते वाहन अथवा व्यक्ती नव्हती अन्यथा मोठे दुर्घटना घडली असती. आज सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
आज सकाळी खंडाळा भागातील एक चारचाकी चालक लोणावळ्याच्या दिशेने येत असताना मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या पुलावरून एक दिशादर्शक फलक वेगात खाली मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पडला. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणी नव्हते. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग हा वर्दळीचा रस्ता आहे. शनिवार व रविवारी तर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी असते. त्यावेळी जर हा फलक पडला असता तर मोठी हानी झाली असती. मिळालेल्या माहितीनुसार सदरचा फलक हा एक संस्थेचा असून सुरक्षेबाबत माहिती देणारा हा फलक आहे.