Breaking news

Accident News l जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात दुचाकीचा अपघात; स्थानिक युवकाचा मृत्यू

लोणावळा : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रा जवळील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारसायकलची समोरून येणाऱ्या भाजी व तरकारीची वाहतूक करणाऱ्या पिकअपला जोरात धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी साडेचार वाजता झाला. सौरव सुखदेव वाघ (वय-२४, रा. वाकसई चाळ, वाकसई, मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या मोटारसायकल स्वाराचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर वाहतूक व लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी करत अपघातात जखमी झालेल्या मोटारसायकल स्वाराला उपचारासाठी तत्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

इतर बातम्या