Lonavala Rain Information l पाच दिवसाच्या मुसळधार नंतर शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला; पाच दिवसात 690 मिमी पाऊस

लोणावळा : लोणावळा शहरात मागील पाच दिवस मुसळधार कोसळल्यानंतर शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. रविवारी रात्री नंतर शुक्रवारी सकाळ पर्यंत 690 मिमी पाऊस झाला आहे. शुक्रवारी पावसाची उघडझाप सुरू होती, सरीवर पाऊस पडत होता.
रविवारी मध्यरात्र ते सोमवारी पहाटे दरम्यान लोणावळ्यात जोरदार पाऊस झाला. तदनंतर बुधवारी व गुरुवारी पुन्हा मुसळधार पाऊस झाला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले होते. पावसाचा जोर पुढील दोन दिवस असाच कायम राहिला असता तर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. सुदैवाने पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक ठिकाणी साचलेले पाणी वाहून गेले आहे. मात्र जून महिन्यात झालेल्या या पावसामुळे लोणावळा व मावळातील प्रशासनाला भविष्यात कुठे पाणी साचणार आहे हे दाखवून दिले आहे. केवळ रहिवासी भागातच नाही तर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मावळात पाणी साचले होते. ही परिस्थिती कशामुळे निर्माण होत आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. विकास होत असताना तो जीवघेणा ठरत नाहीना याचा देखील विचार करण्याची वेळ आली आहे.
रविवार (143 मिमी) सोमवार (109 मिमी), मंगळवार (45 मिमी), बुधवार (221 मिमी), गुरुवार (172 मिमी)