Breaking news

24 तास झाले तरी गवळीवाडा विभागाची बत्ती गुल; तुटलेली लाईन जोडण्याचे काम सुरू – पावसामुळे अडचण

लोणावळा : लोणावळा गवळीवाडा विभागात कुमार पोलीस चौकी समोर असलेल्या एव्हिन हॉटेल मधून एक झाड गुरुवारी सायंकाळी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पडले. तेच झाड वीज वितरण कंपनीच्या लाइनवर पडल्याने विजेच्या तारा तुटल्या होत्या. त्यामुळे गवळीवाडा विभागातील वीज पुरवठा गुरुवारी सायंकाळ पासून खंडित झाला आहे. आज दिवसभर सदरची लाईन दुरूस्तीचे काम सुरू आहे मात्र पावसामुळे कामात अडचणी येत असल्याने 24 तास झाले तरी गवळीवाडा विभागातील वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. विजेवर चालणारी उपकरणे बंद पडली आहेत. गवळीवाडा भागात अनेक दुकाने व हॉटेल असल्यामुळे त्यांचे देखील हाल झाले आहेत. याबाबत बोलताना लोणावळा वीज वितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता आरगडे म्हणाले, पावसामुळे काम करण्यात अडचणी येत आहेत मात्र पुढील तासाभरात वीज पुरवठा सुरू होईल. वीज पुरवठा कोणत्याही परिस्थितीत आज सुरू केला जाईल असे आश्वान त्यांनी दिले आहे. 

इतर बातम्या