ओला उबेर चे ॲप लोणावळा शहरात बंद करा; आमदार सुनील शेळके यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे संघटनेकडून आभार

लोणावळा : लोणावळा शहरातील स्थानिक नागरिकांच्या रोजगाराचा मुद्दा जिल्हाधिकारी पुणे व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्यासमोर ठामपणे मदत लोणावळा शहरांमध्ये ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांचे ॲप बंद करण्याबाबत मागणी केल्याप्रकरणी आमदार सुनील शेळके यांचे लोणावळा शहर टॅक्सी चालक-मालक संघटने कडून आभार व्यक्त करण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने त्यांचा यानिमित्त सत्कार सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय मावकर, सल्लागार निखिल कवीश्वर, लक्ष्मण दाभाडे, अविनाश तिकोणे, नरेंद निकाळजे, अमोल शेडगे, मयुर गाडे, मंगेश कचरे, अभिजित मातेरे, मिलिंद शिरस्कर, शुभम जाधव, विठ्ठल मंदरूपकर, किरण परदेशी, निखिल गायखे, गणेश कडू आदी उपस्थित होते.